लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंदिया: गोंदियातील बाई गंगाबाई महीला रुग्णालय व गोंदिया वैद्यकिय महाविद्यालयातील रक्तपेढीमध्ये २०७५ युनिट इतका मोठ्या रक्तसाठ्याची क्षमता असून सुद्धा बुधवार ७ जून २०२३ पर्यंत फक्त ८८ युनिट रक्त साठा उपलब्ध आहे, तर दररोज २० ते २५ युनिट रक्ताच्या पिशव्या रुग्णांसाठी आवश्यक असतात.

एप्रिल, मे, जूनमध्ये रक्तदान शिबिरे नगण्य असतात. शाळा – महाविद्यालयांना सुट्या आहेत. रक्तपेढीचे तंत्रज्ञ युवराज जांभुळकर यांनी सांगितले की, ७ जून पर्यंत बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, एबी निगेटिव्ह रक्त फार कमी उपलब्ध आहे, तर अर्ध्याहून अधिक साठा (५१ युनिट्स) ओ पॉझिटिव्ह युनिटचा आहे. अशा परिस्थितीत या पुण्य कार्यात सर्वांनी सहभागी होण्याची गरज आहे.

हेही वाचा… आश्चर्य! एकाच डहाळीला तब्बल दोन डझन आंबे

अवघ्या १५ हजार , १६ हजार रुपये मानधनावर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सेवा बंद करून गोंदिया वैद्यकिय महाविद्यालय मधून ६० ते ७० हजार रुपये दरमहा मानधनावर नवीन सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर रक्त उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली होती. त्यांच्या नियुक्ती मुळे रक्तपेढीत कधी ही रक्ताचा तुटवडा भासणार नाही, पण घडले याउलट, आज गोंदियातील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असून केवळ ४ दिवसांचा साठा शिल्लक आहे.

हेही वाचा… वर्धा: मान्यता रद्द करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचे काय होणार?

याविषयी रक्तपेढीचे प्रभारी डॉ. माहुले म्हणाले – सध्या गोंदिया वैद्यकिय महाविद्यालय तर्फे ९ समाजसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती, आम्ही त्यांना या तुटवडा बद्दल कारणे दाखवा अशी पत्रे दिली आहेत. यातील दोन सामाजिक कार्यकर्ते सुटीवर असून, दोन सामाजिक कार्यकर्त्यांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली असून, उन्हाळी हंगाम व शाळा-कॉलेजच्या सुट्या हे रक्तदानाचा वेग कमी होण्याचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा… भंडारा : खळबळजनक! जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाच्या मोबाईलवर प्रश्नांच्या उत्तरांचा ‘स्क्रीनशॉट’, कोतवाल भरती परीक्षा

गोंदिया शहर व परिसरातील, जिल्ह्यातील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्तना रक्तदान करण्याचे आवाहन करून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची विनंती केली आहे असे ही त्यांनी सांगितले. गोंदिया वैद्यकिय महाविद्यालयात एवढी मोठी यंत्रणा असून सुद्धा रक्ताचा तुटवडा का? या प्रश्नांची उत्तरे गोंदिया रक्तपेढीचे प्रभारी डॉ.माहुले यांच्याकडून देण्यात आली. हे नोंद घ्यावे की मार्च २०२२ मध्ये, महाराष्ट्र सरकारने रक्तदान शिबिरे घेऊन, रक्तदान शिबिरांचे विविध प्रसंगी आयोजन करून, रक्त दात्याना प्रोत्साहित करण्याची आणि नियमितपणे शाळा आणि महाविद्यालयांना भेट देऊन त्यातील विद्यार्थ्यांना रक्तदान करण्याचे आव्हान करण्याचे कार्य सातत्याने सुरू रहावे अशी अधिसूचना जारी केली आहे.

रुग्णांना नियमित रक्ताची गरज असल्याने इतर रुग्णांना रक्तपुरवठा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. ६० ते ७० हजार रुपये मानधन घेणारे सामाजिक कार्यकर्ते केवळ खिसा भरण्याकरिता नेमण्यात आले काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shortage of blood in gondia medical college blood bank sar 75 dvr
First published on: 08-06-2023 at 12:49 IST