चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या मोहर्ली येथे रस्त्यावर दोन वाघांनी पर्यटकांना दर्शन दिले. हे दोन्ही वाघ बराच वेळ रस्त्यावर उभे होते.आज सोमवार २५ डिसेंबर रोजी सर्वत्र क्रिसमस साजरा करण्यात येत आहे. क्रिसमस निमित्त सुटी असल्याने ताडोबात पर्यटकांची गर्दी झाली आहे. अशातच सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मोहर्ली चंद्रपूर मार्गावर दोन वाघाचे दर्शन पर्यटकांना झाले.
त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागच्या आठवड्यात ताडोबात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने तीन दिवस मुक्काम केला. यावेळी सचिन व त्याचे मित्रांनी पर्यटनाचा आनंद घेतला. सचिनला देखील वाघांनी दर्शन दिले होते. आता तर रस्त्यावर येऊन वाघांनी पर्यटकांना दर्शन दिले आहे.