नागपूर : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने आंदोलन पुकारल्याने राज्यभरातील ५६० पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधावर स्वाक्षरीच झाली नव्हती.  आता वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित झाल्याने स्वाक्षरीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील सर्व वैद्यकीय शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी ५ जानेवारीपासून पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे अध्यापन बंद केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची आवश्यक हजेरी, शोधप्रबंधावर मार्गदर्शक म्हणून स्वाक्षरीसह इतर गोष्टी अडल्या होत्या. दरम्यान, विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना शोधप्रबंध सादर करण्यास वेळोवेळी मुदतवाढ दिली. याचबरोबर, शिक्षकांकडून स्वाक्षरी करून घेण्यासाठी अधिष्ठात्यांनाही सूचना केली. परंतु, अधिष्ठात्यांनी सूचना केल्यावरही कुणीच स्वाक्षरी करीत नव्हते. राज्यभरातील पदव्युत्तरच्या १ हजार २८ पैकी केवळ ४६८ विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधावरच स्वाक्षरी झाली होती. इतर विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधावर स्वाक्षरी न झाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक सत्र पूर्ण झाले नव्हते. अखेर १८ मार्चला वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीतील आश्वासनाप्रमाणे संघटनेला वैद्यकीय संचालकांकडून लेखी पत्र मिळताच आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधावर लवकरच स्वाक्षरी होऊन हा प्रश्न सुटणार आहे.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Babasaheb Ambedkar Research and Training Institute
बार्टीचे अधिकारी निघाले लंडनला! ग्लोबल भीमजयंतीच्या नावाखाली वंचित विद्यार्थ्यांच्या पैशाचा…
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती

पदव्युत्तरचे २,२२० विद्यार्थी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या अखत्यारित पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे एकूण २ हजार २२० विद्यार्थी आहेत. यापैकी १ हजार १७२ विद्यार्थी खासगी महाविद्यालयातील असून त्यांच्या शोधप्रबंधावर स्वाक्षरी झाली आहे. शासकीय महाविद्यालयातील १ हजार २८ विद्यार्थी आहेत.

वैद्यकीय शिक्षकांचे आंदोलन स्थगित झाले आहे. त्यामुळे तातडीने सर्व शोधप्रबंधावर स्वाक्षरी होऊन ते आरोग्य विद्यापीठाकडे पाठवले जातील. शिक्षकांच्या आंदोलन काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठाने काळजी घेतली.

– डॉ. अजित पाठक, परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक.