यवतमाळ: आर्णी येथील सराफा व्यावसायिकाला चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ११ लाख दहा हजार ५५९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नीलेश इसाजी ठाकरे (२९, रा. माळेगाव, ता. आर्णी), किरण उर्फ गांधी गोपाल कोरचे (१९, रा. संकटमोचन रोड), अतुल शंकर कुंभेकर २९, रा. बोधड) यांना सुरुवातीला अटक करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पवन उर्फ काल्या संतोष काकडे (२४, रा. आदिवासी सोसायटी), दर्शन उर्फ भिंगोटी राजू ढोरे (१९, रा. रेणुका मंगल कार्यालय), पद्मा उर्फ बाली विजय नागभीडकर (४०, रा. जामनकरनगर) यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात सहा आरोपी असल्याने दरोड्याच्या कलमात वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा… अमरावती: २५ कोटींचा निधी देण्‍याच्‍या नावावर शिक्षण संस्थाचालकाची ३० लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक आरोपी अजूनही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे. १ जुलै रोजी सराफा व्यावसायिक लखन जयस्वाल हे सावळी सदोबा येथील दुकान बंद करून परत जात असताना त्यांना केळझरा कोमटी ते अंतरगाव रोडवर अडवून लुटमार केली. याप्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरोड्याच्या प्रकरणात ११ लाख १० हजार ५५९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, ठाणेदार केशव ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन अजमिरे आदींनी केली.