Premium

अमरावती : नात्‍याला काळीमा! वासनांध मुलाने जन्मदात्रीकडेच केली शरीरसंबंधांची मागणी; धामणगाव तालुक्‍यातील घटना

धामणगाव रेल्वे तालुक्यात आई आणि मुलाच्‍या नात्‍याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका वासनांध मुलाने चक्क जन्मदात्रीकडे शरीरसंबंधांची मागणी केली.

son demands physical relation
अमरावती : नात्‍याला काळीमा! वासनांध मुलाने जन्मदात्रीकडेच केली शरीरसंबंधांची मागणी; धामणगाव तालुक्‍यातील घटना (प्रातिनिधिक छायाचित्र)

अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यात आई आणि मुलाच्‍या नात्‍याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका वासनांध मुलाने चक्क जन्मदात्रीकडे शरीरसंबंधांची मागणी केली. मुलाच्‍या या विकृतीमुळे हादरून गेलेल्‍या या महिलेने पोलीस ठाणे गाठून मुलाच्‍या विरोधात तक्रार नोंदवली. त्‍या आधारे पोलिसांनी गुन्‍हा नोंदवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – अंदमानमध्ये रेंगाळलेला मान्सून आज केरळमध्ये धडकणार! महाराष्ट्रात दहा जूनला पावसाचे आगमन

३ जून रोजी रात्री आठच्या सुमारास हा धक्कादायक घडला. या प्रकरणी ५० वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिच्या ३० वर्षीय विकृत तरुण मुलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ३ जून रोजी रात्री ११.५० सुमारास दत्तापूर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. संबंधित महिला रात्रीच्या वेळी घरात काम करीत असताना आरोपी तिच्याजवळ गेला. अतिशय चुकीच्या पद्धतीने बोलून आरोपीने त्या महिलेच्‍या अंगाला स्‍पर्श करून शरीर संबंधाची मागणी केली. तिचा विनयभंग केला. पोटच्या मुलाची ही विकृती ती सहन करू शकली नाही. तिने तितक्याच रात्री दत्तापूर पोलीस ठाणे गाठून तरुण मुलाविरुद्ध तक्रार नोंदविली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 15:22 IST
Next Story
अंदमानमध्ये रेंगाळलेला मान्सून आज केरळमध्ये धडकणार! महाराष्ट्रात दहा जूनला पावसाचे आगमन