बुलढाणा : सोयाबीनसह तेलबियावरील निर्बंध केंद्र सरकारने उठवल्यामुळे सोयाबीनच्या भावामध्ये वाढ होत असून त्याचा फायदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे यासंदर्भात त्यांनी पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न केले.

हेही वाचा >>> अकोला: गद्दारांचे घटनाबाह्य सरकार काही महिन्यात कोसळणार; आदित्य ठाकरे

तेलबियांची आयात रद्द करण्यासंदर्भातील निवेदन जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे २ एप्रिल २०२२ ला सादर केले होते. केंद्र सरकारने तेलबियांवरील आयात शुल्क माफ करून निर्बंध हटवल्यामुळे सोयाबीनला क्विंटलमागे अधिकचा भाव मिळू लागला आहे. खुल्या बाजारपेठेमध्ये तेलबियांच्या दरात वाढ झाल्यास सोयाबीनला भविष्यात चांगला भाव मिळेल. त्याचा फायदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होईल, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली आहे.