एसटी महामंडळाचे सर्व विभाग नियंत्रकांना निर्देश; भरारी पथकातील सदस्य बदलण्याच्या सूचना

महेश बोकडे

अपघात नियंत्रणासाठी आता ‘एसटी’ बस चालवणाऱ्या चालकांच्या भ्रमणध्वनी संबंधित हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. सोबत एका विभागातून दुसऱ्या विभागात तपासणीसाठी जाणाऱ्या भरारी पथकाच्या सदस्यांमध्येही वेळोवेळी बदल करा, असेही आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहे.

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

राज्यातील बऱ्याच भागात ‘एसटी’ बसचे अपघात झाले आहेत. त्यामुळे १६ ते २१ जानेवारीदरम्यान राबवायच्या विशेष व्यापक प्रभावी मार्ग तपासणी कार्यक्रमात आता चालकांच्या भ्रमणध्वनीसंबंधित हालचालींवरही लक्ष केंद्रित केले गेले. नवीन आदेशानुसार अपहार प्रवृत्त वाहक, कुटुंब सुरक्षा योजना अंतर्गत घेतलेल्या वाहकांची यादी संबंधित विभागाने तपासणी पथकास द्यायची आहे. यावेळी चालक कामगिरी करताना भ्रमणध्वनीवर हेडफोन लावून संभाषण करतात, गाणी ऐकतात, त्यामुळे कामगिरीकडे दुर्लक्ष होऊन अपघाताची शक्यता नकारता येत नाही.

अपघात नियंत्रणासाठी चालकांच्या भ्रमणध्वनीवरील हालचालींवर लक्ष ठेवून दोषींची माहिती संबंधितांना द्यायची आहे. सोबत लांब, मध्यम सगळय़ाच गटातील विनावाहक व वाहक गटातील बस फेऱ्यांची मार्ग तपासणीही विविध पथकांकडून वेळोवेळी करायची आहे. त्यानुसार वाहकांचे तिकीट ट्रे वारंवार तपासावे, वाहक ‘ईटीआय मशीन’मधून आवश्यक ‘एक्स्ट्रा’ तिकिटाचा वापर करतात, त्याचीही कसून तपासणी करावी, ‘व्हॅल्यू अॅडेड सव्र्हिस’ अंतर्गत मे. ‘ट्रायमॅक्स’ यांच्या प्रतिनिधींमार्फत विविध ठिकाणी तिकीट विक्री सुरू असून त्यांच्यातर्फे आरक्षित केलेले तिकीट व प्रत्यक्षातील प्रवासी संख्या तपासण्याचेही आदेशात नमूद आहे.

‘एसटी’ महामंडळ प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने सगळे कर्मचारी प्रयत्नही करत आहेत. महामंडळाकडून अपघात नियंत्रणासह महामंडळाचे उत्पन्न वाढीसाठी १७ ते २१ जानेवारीदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. त्यात चालकांच्या भ्रमणध्वनीबाबतच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जाईल.-शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक (वाहतूक), एसटी महामंडळ, मुंबई.