लोकसत्ता टीम

अकोला : “जिल्ह्यातील शहिदांच्या पुतळ्याचे एकाच ठिकाणी एकत्रित संग्रह करणारे अकोला कदाचित पहिले शहर असेल. या संकल्पनेसाठी पाठपुरावा करणारे तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडू यांचे विशेष अभिनंदन करतो. हे शहीद स्मारक भावी पिढीला निश्चितच प्रेरणा देईल,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

अकोला शहरातील शहीद स्मारकाच्या नुतनीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात शनिवारी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रणवीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-सोन्याच्या दरात मोठी घसरण; आजचा निच्चांकी दर किती? पहा एका क्लिकवर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, ‘शहिदांच्या कुटुंबीयांनी आपले सुपुत्र देशसेवेसाठी अर्पण केले. या सुपुत्रांमुळेच भारत देशात लोकशाही अबाधित आहे. जगाच्या पाठीवर एक मजबूत देश म्हणून भारत समोर आला आहे. आपले सैनिक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देश सेवा करीत असतात. वेळप्रसंगी शत्रू राष्ट्रांचे नामोहरम करतात. सर्व शहिदांचे पुतळे एकाच ठिकाणी उभारण्याची अतिशय चांगली संकल्पना राबविण्यात आली आहे.’

शहीद स्मारकापासून प्रेरणा मिळण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिली.