scorecardresearch

Premium

भाजप सरकारने ओबीसी महिलांना आरक्षणाबाहेर ठेऊन त्यांच्या मानसिकतेचे दर्शन घडवले, ॲड. नंदा पराते यांची टीका

काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. नंदा पराते म्हणाल्या, केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी महिलांना आरक्षणाबाहेर ठेऊन त्यांच्या मानसिकतेचे दर्शन घडवले.

BJP
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी ओबीसी महिलांना आरक्षणात स्थान नसणे यावर आक्षेप घेतला आहे. (फोटो- प्रातिनिधिक)

लोकसत्ता टीम

नागपूर : नारी शक्ती वंदन विधेयक संसदमध्ये सर्व पक्षीय समर्थनाने मंजूर झाला. सरकारकडून याला एतिहासिक घटना असल्याचे सांगितले तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी महिला आरक्षण लागू होण्याची काळ निश्चित नसणे आणि ओबीसी महिलांना आरक्षणात स्थान नसणे यावर आक्षेप घेतला आहे.

व्हिडीओकॉन कर्ज घोटाळ्याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने गुन्हे अन्वेशन विभागाला (सीबीआय) फटकारलं आहे.
Videocon Loan Case : उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारलं, म्हणाले, “चंदा कोचर आणि त्यांच्या पतीच्या अटकेवेळी…”
sarwan singh pandher
‘आम्ही पाकिस्तानमधून नाही आलो’, पोलीस दलाच्या कारवाईनंतर शेतकरी नेत्याचे विधान
CAPF
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांनाही प्रोत्साहन, प्रसूती रजेसह ‘या’ सुविधाही मिळणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
Cases registered against BJP workers for Slogans in support of MLA Gaikwad in Ulhasnagar
उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, न्यायालय परिसरात आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

याबाबत काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. नंदा पराते म्हणाल्या, केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी महिलांना आरक्षणाबाहेर ठेऊन त्यांच्या मानसिकतेचे दर्शन घडवले. सन २०१० मध्ये काँग्रेसने सरकारने महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर केले, त्यावेळी भाजपने विरोध केला. खऱ्या अर्थाने मोदी सरकारला महिलांना आरक्षण द्यायचे नाही तर निवडणूक प्रचारात वापर करायचे आहे. भारताची जनगणना व मतदारसंघ फेररचना निश्चित नाही म्हणजेच महिलांना आरक्षण मिळण्यापूर्वीच वाद-विवाद उभा करण्याचा प्रयत्न आहे.

आणखी वाचा-यवतमाळ वाशीम लोकसभेसाठी भाजप आग्रही; शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता

महिलांची दिशाभूल करून राजकारणासाठी भाजप राजकारण करणार आणि निवडणुकीत महिलांना आरक्षणाचे झुनझुने दाखविणार, पण महिला आता दिशाभूल करवून घेणार नाही. इंडिया आघाडी सत्त्तेवर येईल आणि महिलांना संविधानानुसार वाढीव आरक्षण लागू करेल तेव्हा भाजपचे आरक्षण विरोधी भूमिकेला लगाम लागेल, असे ॲड. पराते म्हणाल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: State secretary of congress adv nanda parate criticise bjp rbt 74 mrj

First published on: 22-09-2023 at 15:56 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×