नागपूर : परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनावरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित करावे, असे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले. याच्या अंमलबजावणीच्या तरखेबाबतही त्यांनी महत्वाचे भाष्य केले.येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्य भाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. सहाजिकच मराठी भाषेचे संवर्धन करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. तथापि, राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये लिहीली असते. (उदा . ‘बेटी बचाव बेटी पढाव’) त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारवर बंधने येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पुढे असे सामाजिक संदेश, जाहिरात व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास ( उदा . मुलगी वाचवा..मुलगी शिकवा..!) महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होईल. तसेच मराठी भाषेचा योग्य सन्मान राखला जाईल. त्यासाठी येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश तसेच इतर महत्वाच्या जाहीराती व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहीण्याची अंमलबजावणी सुरु करावी. तसे निर्देश परिवहन आयुक्त यांना दिल्याचे मंत्री सरनाईक यांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले. त्यामुळे याची अंमलबजावणी काशी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.