अकोला : जिल्ह्यातील जनावरांमध्ये ‘लम्पी’ प्रादुर्भाव वाढत आहे. आता शहरातदेखील ‘लम्पी’बाधित जनावर आढळून आले. शहरातील हिंगणा मार्ग परिसरातील एका नर वासरात ‘लम्पी’ त्वचारोगाची बाधा झाली. त्यामुळे संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्याचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी विजय पाटील यांनी आज निर्गमित केला. हेही वाचा - अद्भूत! टॅबलेट, कॅप्सूलपासून साकारले गणराय, मोताळ्यातील ‘फार्मासिस्ट’ची अनोखी कलाकृती; दर्शनासाठी भाविकांची रीघ हेही वाचा - पाच मित्रांची यशोगाथा! एकत्र अभ्यास केला अन् एकाच वेळी एमपीएससीच्या दोन परीक्षेत घवघवीत यश बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. संसर्ग केंद्राच्या पाच कि.मी. परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण १०० टक्के पूर्ण यावे, असे आदेश पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.