लोकसत्ता टीम

बुलढाणा : तिथीनुसार साजरी करण्यात आलेल्या शिवजयंतीला नांदुरा येथे गालबोट लागले. मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्याने किमान ६ जण जखमी झाले. काल मध्यरात्रीनंतर गुन्हे दाखल केल्यावर आज शुक्रवारी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे.

Vasundhara Day, Yavatmal,
‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
transgender votes went from 32 to 28 in 24 hours difference in figures given to candidate
तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत
murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गुरुवारी रात्री निघालेली मिरवणूक शांततेत सुरू होती. अंबादेवी गड परिसरातून मिरवणूक सुरू होताच मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर समाजकंटक पळून गेलेत. पोलिसांनी परिस्थिती काहीशी नियंत्रणात आणल्यावर मिरवणूक पुन्हा सुरू झाली. मिरवणूक उस्माणीया चौकात आल्यावर मिरवणुकीवर पुन्हा दगडफेक झाली. नांदुरा ठाणेदार विलास पाटील, कैलास सुरळकर घटनास्थळी दाखल झाले.

आणखी वाचा-ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…

रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू होती. मध्यरात्रीनंतर अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. काल रात्री व आज सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही नांदुरा शहराला भेट दिली. शहरात तणावपूर्ण शांतता असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज व अन्य माहितींच्या आधारे अटकसत्र सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.