लोकसत्ता टीम

नागपूर : केंद्र सरकारने नोटाबंदी केल्यावर दोन हजारांच्या नोटा चलनात आल्या होत्या. रिझर्व बँक ऑफ इंडियाने विविध बँकेत ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा जमा कराव्या, असे निर्देश दिले आहे. महावितरणने २७ सप्टेंबरपासूनच या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. तर एसटी महामंडळ २८ सप्टेंबरपासून या नोट स्वीकारणे बंद करणार आहे.

water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Mahavitarans electricity customer service center in Vasai Virar closed
वसई विरारमधील महावितरणचे वीज ग्राहक सेवा केंद्र बंद
incident of Lonavala Municipal Council discharging sewage directly into rivers Pune news
लोणावळा नगर परिषदेकडून जलप्रदूषण! सांडपाणी थेट नद्यांत सोडल्याचा धक्कादायक प्रकार
Electricity theft worth Rs 24 lakhs from Mahavitaran revealed in Titwala
टिटवाळा येथे महावितरणकडून २४ लाखाची वीज चोरी उघड
Itwari railway station redevelopment work completed look of station changed
नागपूर : इतवारी रेल्वेस्थानकाचे रूपडे पालटले ‘या’ नवीन नावाने…

महावितरणच्या नागपूरसह विविध भागातील वीज देयक भरणा केंद्रावर बुधवारी एकाही ग्राहकाकडून दोन हजार रुपयांच्या नोटा वीज देयकापोटी स्वीकारण्यात आल्या नाही. त्यामुळे ग्राहकांना एकतर दुसऱ्या नोटा देणे अथवा परत बँकेत जाऊन नोटा बदलून देयक भरावे लागले. महावितरणने २८ सप्टेंबरला ईद आणि अनंत चतुर्दशीची सुट्टी असल्याचे कारण सांगत २७ सप्टेंबरलाही दोन हजारांच्या नोटा स्वीकारल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आणखी वाचा-महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण, वडेट्टीवार असे का म्हणाले…

तर दुसरीकडे एसटी महामंडळानेही २८ सप्टेंबरपर्यंत प्रवास भाड्यापोटी नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २८ सप्टेंबरनंतर एसटीकडूनही दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने मुदत वाढवल्यास वरिष्ठांच्या सूचनेनुसार नोटा स्वीकारण्याबाबत निर्णय होणार असल्याचे दोन्ही विभागातील स्थानिक अधिकारी सांगत आहेत.

संबंधित अधिकारी अडचणीत येणार?

महावितरण आणि एसटी महामंडळाकडून संबंधित अधिकाऱ्यांना कोणत्याही स्थितीत दोन हजारांच्या स्वीकारलेल्या नोटा संबंधित बँकेत २९ सप्टेंबरच्या पूर्वी भरण्याच्या सूचना आहे. या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Story img Loader