कर्मचारी संघटनांकडून संप स्थगितीची घोषणा उशिरा

नागपूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पूर्वसंध्येला शासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संघटनांनी संपाबाबत फेरविचार करण्याचा निर्णय घेतला खरा, पण त्याची माहिती जिल्हापातळीवर पोहचू शकली नसल्याने बुधवारी अनेक सरकारी कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले. दुपारनंतर अधिकृतपणे संप स्थगित करण्याची घोषणा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून करण्यात आली. त्यामुळे कर्मचारी दुपारपर्यंत संपावर व नंतर कामावर, असे चित्र सरकारी कार्यालयात दिसून आले.

Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

२३ आणि २४ फेब्रुवारी अशा दोन दिवस संपाची हाक देणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी व जि.प. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपाच्या एक दिवस आधी रात्रीला चर्चेला बोलावले. ही बैठक रात्रीपर्यंत चालली. त्यात संघटनेच्या २८ मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. सरकार सर्व मागण्यांबाबत सकारात्मक असल्याने संघटनांच्या नेत्यांनी संप मागे घेण्याची तयारी दर्शवली. मात्र याबाबत माहिती राज्यातील विविध जिल्ह्यापर्यंत पोहचू शकली नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे नागपुरातील बहुतांश सरकारी कार्यालयातील संपावर गेले. त्यांनी नारे, निदर्शनेही केली. समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त, जातपडताळणी विभाग, सहायक आयुक्त कार्यालयातील १०० टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले होते. सरकारी कर्मचाऱ्यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाना महल्ले यांच्या नेतृत्वात पाटबंधारे कार्यालय परिसरात निदर्शने केली. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय, जि.प. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कामावर गेले नाही. ग्रामीण भागातही अशीच स्थिती होती.

शासनाशी सकारात्मक चर्चा -दगडे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या दोन तासाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यांची भूमिका सकारात्मक होती. त्यांनी केलेल्या आवाहनानंतर संप दोन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आला, असे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी सांगितले.