चंद्रपूर: भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात न आल्याने त्याच्या तीव्र प्रतिक्रिया समाजमाध्यमावर उमटल्या आहेत. हा मुनगंटीवार यांच्यावर अन्याय आहे, अशी भावना त्यात व्यक्त करण्यात आली आहे.

शपथविधीनंतर समाजमाध्यमावर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला आहे. मुनगंटीवारांना विरोध म्हणजे विकासाला विरोध, असेही मत भाजप पदाधिकारीच नाही तर जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते व विविध संघटनांचे अनेक पदाधिकारी व्यक्त करित आहेत.

हेही वाचा – महायुतीच्या आमदारांचे गुरुवारी ‘ बौद्धिक ‘, अजित पवार रेशीम बागेत जाणार का ?

एक अभ्यासू लाेकप्रतिनिधी अशी सुधीर मुनगंटीवार यांची ओळख आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे स्थान पक्के आहे असाच सर्वांचा समज होता. मात्र त्यांना वगळण्यात आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. फक्त भाजप कार्यकर्तेच नाही तर सामान्य नागरिक देखील समाजमाध्यमावर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे.

हेही वाचा – Sushma Andhare : जय श्रीरामच्या घोषणा देत सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; फेसबुक पोस्ट करत सांगितले पहाटे ३ वाजता काय घडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनगंटीवार यांच्यावर तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. अर्थमंत्री, वनमंत्री तसेच सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय उजवी आहे. अर्थमंत्री म्हणून शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर करणारे मुनगंटीवार राज्यातील एकमेव मंत्री आहेत. सुशिक्षित, कार्यतत्पर, सांस्कृतिक क्षेत्राला उभारी देणारा, वनक्षेत्रात क्रांती करणारा, अनुभवी, सलग सातव्यांदा निवडून येणारा विदर्भातील भाजपचा एकमेव आमदार, पक्ष संघटनेच्या विस्तारात योगदान देणारा नेता, मिळालेल्या खात्याला न्याय देणारा मंत्री अशा सर्व जमेच्या बाजू असताना त्यांना मंत्रिपदापासून का दूर ठेवले, असा प्रश्न आता भाजपा पदाधिकारी विचारत आहे.