नागपूर : त्याच्या अधिवासात अतिक्रमण करू पाहणाऱ्या कित्येकांना त्याने धूळ चारली. तिघांना थेट यमसदनी धाडले. तो कित्येकदा गंभीर जखमी झाला. आता तर त्याला शिकार पण करता येत नव्हती. पण नव्याने तो उभा झाला आणि पुन्हा त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या साम्राज्यात घुसखोरी करु पाहणाऱ्याला शह देण्यासाठी तो परत येतोय. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “छोटा मटका” आता पुन्हा एकदा त्याचे साम्राज्य गाजवण्यास सज्ज झाला आहे. त्याचा अलीकडचा एक व्हिडिओ वन्यजीवप्रेमी कंचन पेटकर यांनी चित्रित केला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील काही वाघांनी या व्याघ्रप्रकल्पाला ओळख दिली असे म्हंटले तर खोटे ठरणार नाही. ताडोबाच्या बफर क्षेत्रात या वाघाने आपले साम्राज्य निर्माण केले आहे. अगदी अलिझंझा ते निमढेला असा त्याचा मुक्त वावर असतो. प्रसिद्ध वाघीण “छोटी तारा” आणि शक्तिशाली वाघ “मटकासुर” यांचा तो वारसदार. “छोटा मटका” या वाघाने “मोगली” आणि “बजरंग” या दोन वाघांसह इतर प्रभावी वाघांकडून आलेल्या आव्हानांना तोंड दिले आहे आणि त्याने एका विशाल प्रदेशावर आपले साम्राज्य स्थापित केले आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी अनेकांना त्याने धूळ चारली. तर तर तिघांना थेट यमसदनी धाडले. त्यातलाच एक “बजरंग” शक्तिशाली वाघ, पण त्यालाही यमसदनी धाडले. त्या प्रत्येकवेळी तो जखमी झाला आणि त्यातून उठून पुन्हा उभा राहिला. यावेळची गोष्ट मात्र वेगळी होती.
“छोटा मटका” रक्तबंबाळ झाला होता आणि त्याच्या पायाला मोठी चिर पडली. त्यामुळे चालनेच काय तर उठणेदेखील कठीण होते. त्याच्या याच स्थितीचा फायदा इतर वाघांनी घेण्याचा प्रयत्न केला. असंख्य मारामाऱ्या करून थकलेल्या “छोटा मटका” ला पाहून त्याचे साम्राज्य बळकावण्यासाठी सुरुवातीला “बाली” नावाच्या नवीन वाघाने आक्रमण करणे सुरु केले. त्याच्या बरोबर “वीरभद्र” नावाचा वाघ ही घुसखोरी करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे या भागात लवकरच उलथापालथ होईल, असे पर्यटकांना वाटत आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील 'छोटा मटका' आता पुन्हा एकदा त्याचे साम्राज्य गाजवण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या अधिवासात अतिक्रमण करू पाहणाऱ्या कित्येक वाघांना त्याने धूळ चारली आहे. त्याचा अलीकडचा एक व्हिडिओ वन्यजीवप्रेमी कंचन पेटकर यांनी चित्रित केला आहे.… pic.twitter.com/EFRjTuOuiM
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) June 21, 2025
दुसरा अतिक्रमण करू पाहणारा वाघ म्हणजे “नाल्या” सध्या तो सुद्धा स्वतः साठी अधिवास शोधतोय. “बेला” व “झायलो” चा हा बछडा आता मोठा झालाय. बापाच्याच साम्राज्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्या जोडीला “वीर” नावाचा “वीरा” व “झायलो” चा दुसरा बछडा आहेच. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर शांत बसेल तो “छोटा मटका” कसला? त्याच्या एकूणच स्थितीनंतर चाहतेही काळजीत पडले होते. त्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना त्याच्यावर उपचार करण्यासाठी आर्जव केले. त्याच्यावर जागीच उपचार करण्यात आले आणि आता तो पुन्हा एकदा आपल्या साम्राज्यात परत येत आहे.