नागपूर : राज्यात शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, दरवर्षीप्रमाणे यावेळीही निकालाचा टक्का घसरला आहे. ३ लाख १९६२ पैकी केवळ ६४ हजार ८३० परीक्षार्थी सीईटीसाठी पात्र ठरले आहेत.

हेही वाचा – प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित अंत! मित्राच्या बहिणीवर जीव जडला, मग भावानेच मित्राचा काटा काढला…

All the Chief Executive Officers of the Zilla Parishad were given instructions regarding the recruitment of teachers Pune print news
शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया कधीपासून? शिक्षण विभागाने काय सांगितले?
UPSC Releases Exam Schedule for 2025, Registration Dates and Exam Details Announced, upsc exams 2025, upsc exms 2025 exam schedule, Union Public Service Commission, Competitive Examination, marathi news, students, maharashtra students
पुढील वर्षीच्या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक UPSC कडून जाहीर; नागरी सेवा परीक्षा कधी होणार?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Palghar, teachers election training,
पालघर : निवडणूक प्रशिक्षणाकरिता शिक्षकांची तारांबळ, मुल्यांकन चाचणी व निवडणूक प्रशिक्षण एकाच वेळेत

सध्या सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात पुन्हा २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत शिक्षक भरतीसाठी अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शिक्षण खात्याने दरवर्षी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दरवर्षी टीईटी घेऊन शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात टीईटी घेतली होती. यावेळी टीईटीच्या पहिल्या पेपरला १ लाख ४३ हजार ७२०, तर दुसऱ्या पेपरला १ लाख २७,१३१ परीक्षार्थी बसले होते. मात्र, दरवर्षीप्रमाणे शिक्षक भरतीसाठी पात्र ठरणाऱ्या परीक्षार्थींची संख्या कमी असल्याचे निकालावरून दिसून आले. पहिला पेपर दिलेल्यांपैकी फक्त १४ हजार ९२२, तर दुसरा पेपर दिलेले ४९ हजार ९०८ परीक्षार्थी पास झाले आहेत.

हेही वाचा – बुलढाणा : सिंदखेडराजा, देऊळगाव राजा तालुक्यात अवकाळीचे तांडव! अतिवृष्टीसदृश पावसाने झोडपले; हजारो हेक्टरवरील पिके आडवी

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात १३ हजार ५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना शाळांचे वाटप केल्यानंतर नवीन शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात झाली आहे.