बुलढाणा : अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत व अन्य मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने मंगळवारी (दि२६) रात्रभर जागर आंदोलन केले. ढोल खंजेरीच्या निनादात संग्रामपूर तहसील समोर ठिय्या देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. तहसीलदारांनी रात्री उशिरा निवेदन स्वीकारून कारवाईचे आश्वासन दिले. संग्रामपूर तहसिल कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या जागर आंदोलनाने किमान प्रशासनाची झोप उडविण्यात आंदोलक यशस्वी ठरले. सन २०२२ व जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती पिकाची प्रचंड हानी झाली. त्याची अजूनही रखडलेली मदत देण्यात यावी या मुख्य मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. तसेच लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळखंडोबा करणारा सरकारी शाळांच्या खाजगीकरणाचा व शासकीय कार्यालयामधील कर्मचारी भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, या मागण्याचा निवेदनात समावेश आहे. हेही वाचा - बुकी सोंटू जैनने नागपूर पोलिसांना बनवले ‘मामा’, पोलिसांना गुंगारा देऊन झाला फरार; वेश बदलून… शासन अनावश्यक बांधकामांना त्वरित निधी मंजूर करीत आहे. मात्र हवालदिल शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही. त्यामुळे शासनाने त्वरित कार्यवाही करावी अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या मागण्यांसाठी झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी यावेळी जागरण गोंधळ करून शेतकऱ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अश्या घोषणा देण्यात आल्या. यादरम्यान संग्रामपूर तहसीलदार योगेश टोम्पे यांनी रात्री ११ च्या दरम्यान आंदोलनाला भेट देऊन निवेदन स्वीकारले. हेही वाचा - रेल्वेत ३१०० जागांसाठी मेगाभरती, बेरोजगारांना सरकारी नोकरीची संधी! आंदोलनात यावेळी स्वाती वाकेकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, संतोष राजनकर, मोहन रौंदळे, अमोल घोडेस्वार, अभयसिंह मारोडे, शंककरनाथ विश्वकर्मा, अफरोज शेख , सैय्यद असिफ, अविनाश उमरकर, ललित सावळे, अशोक सरदार, कमरोद्दीन मिर्झा, गणेश टापरे, युसुफ रजा, गणेश मनखैर,सद्दाम शेख, गफ्फार मिस्त्री, जहीर अली, सुरेश तायडे, योगेश बाजोड, गणेश खिरोडकर, शेख अफसर कुरेशी, सिद्दीक कुरेशी, अमित रंगभाल, प्रकाश साबे, गजानन ढोकणे, विलास पुंडे, प्रकाश देशमुख, रणजीत गंगतीरे, ज्ञानेश्वर वानखडे, संजय पवार, बळीराम धुळे, संदीप गट्टे, विशाल केदार, सिकंदर खान, हमजा खान पठाण, राजेश परमाळे, प्रशांत गिरी, पंकज तायडे, संगम इंगळे सहभागी झाले.