वर्धा : नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त भव्य संमेलनाचे आयोजन झाले. नागपूरलगत असणाऱ्या जिल्ह्यांना गर्दीचे विशेष टार्गेट देण्यात आले होते. मात्र या गर्दी गोळा करण्याच्या मुद्द्यावरून राजी नाराजी नाट्य रंगले. जिल्ह्यास तीनशे गाड्या आणण्याचे उद्दिष्ट होते. विधानसभा क्षेत्र निहाय वाटप झाले. मात्र संघटनेच्या इतर शाखांचा विचारच झाला नाही. युवक, महिला काँग्रेस, ओबीसी सेल, कामगार सेल, व अन्य शाखा अध्यक्षांना गाड्या मिळाल्या नाहीत. ते वेळेपर्यंत धावपळ करीत होते. शेवटी हिरमुसून शांत बसले. त्यांची भावना पाहून जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर संतापले. पण तो व्यक्त न करता त्यांनी मौन नाराजी प्रकट केली.

जावू द्या, नाही मिळाली गाडी तर दुःखी होवू नका. आपण इथेच स्थापना दिन साजरा करूया. अश्या भावनेत ते आल्याचे कळले. त्यांनी आपल्या या सहकाऱ्यांसह जिल्हा कार्यालयातच स्थापना दिनाची पूजा मांडली. गांधीजींच्या प्रतिमेला हार अर्पण करीत सोहळा आटोपला. मात्र चांदूरकर ही बाब नाकारतात. ते म्हणाले की वेळेवर माझी प्रकृती खराब झाल्याने मी जावू शकलो नाही. पण थोडे बरे वाटल्यावर जिल्हा कार्यालयात कार्यक्रम घेतला. गाड्या न मिळण्याची बाब दुय्यम आहे. मोठ्या कार्यक्रमात काही बाबी होतातच. त्याचे दुःख नाहीच.

हेही वाचा – नागपूर : काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर मंथन, राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेबाबतही चर्चा

हेही वाचा – लोकसत्ता इम्पॅक्ट : माजी जि.प. अध्यक्षाच्या पुत्रावर ‘अट्रोसिटी’चा गुन्हा दाखल, महिला सरपंचाला शिवीगाळ करणे भोवले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदूरकर नाराजी उघडपणे व्यक्त करीत नाहीत. पण पक्षाच्या प्रत्येक यात्रा, कार्यक्रम, उपक्रमात त्यांचा सहभाग लक्षणीय असतो. हल्ला बोल यात्रा त्यांनीच यशस्वीपणे सांभाळली. यावेळी त्यांचा मान राखल्या गेला नाही, हे चुकलेच, असे मत एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. त्यांच्यावर लोभ असणारे नेते सुनील केदार यांची गैरहजेरी ही चांदूरकर यांना डावलणारी ठरल्याची एक प्रतिक्रिया आहे.