जिल्ह्यात आता वाघ मोकळ्या रस्त्यावर फिरायला लागले आहेत. रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ बघता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना वाघासाठी मुख्य रस्ता मोकळा करून देत वाहतूक रोखून धरावी लागली.

सायगाटाच्या जंगलात वाघ व दोन पिल्लांचे वास्तव्य आहे. या मुख्य सिमेंटच्या रस्त्यावर वाहतुकीमुळे वाघाला रस्ता पार करणे कठीण झाले होते. ही बाब वन विभागाच्या लक्षात येताच वन कर्मचाऱ्याने वाहतूक रोखून धरली. त्यानंतर वाघाला रस्ता मोकळा करून दिला. वाघ निघून गेल्यानंतर वाहतूक सोडण्यात आली. वाघ रस्ता पार करतानाचा व्हिडीओ समाजमाध्ममांवर फिरत आहे.