कोंबड्यांची शिकार करायला गेलेला बिबट खुराड्यात अडकल्याची घटना आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास भद्रावती शहरातील खापरी वॉर्ड येथील साई नगरात उघडकीस आली.येथील निरंजन रामचंद्र चक्रवर्ती यांच्या घरातील पाळीव कोंबड्यांच्या खुराड्यात अडीच वर्षीय बिबट्याने प्रवेश केला. तेथील काही कोंबड्यांना त्याने आपले भक्ष्य बनविले. यानंतर मात्र तो खुराड्यातच अडकला. घटनेची माहिती परिसरात हवेसारखी पसरली आणि भल्यापहाटे एकच खळबळ उडाली.

हेही वाचा >>> नागपूर : जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव ; पाच किलोमीटर परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकल्याचे कळताच वनविभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी ५ वाजतापासून साडेदहा वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. वैद्यकीय तपासणी करून त्यास भद्रावती वनपरिक्षेत्रातील जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले.