scorecardresearch

पतीलाही पत्नीकडून खावटी मागण्याचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींकडे लक्ष वेधताना पतीलाही पत्नीकडून खावटी मागण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पतीलाही पत्नीकडून खावटी मागण्याचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींकडे लक्ष वेधताना पतीलाही पत्नीकडून खावटी मागण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. हा कायदा लिंगभेद करत नाही. पती व पत्नी हे दोघेही एकमेकांकडून खावटी घेण्यासाठी दावा दाखल करू शकतात, असे न्यायालय म्हणाले. न्यायमूर्तीद्वय रोहित देव व उर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिला. हिंदू विवाह कायद्यातील कलम २५ मध्ये कायमस्वरूपी खावटी तर, कलम २४ मध्ये न्यायालयात याचिका प्रलंबित असताना तात्पुरती खावटी देण्याची तरतूद आहे. उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे स्वत:ची देखभाल करण्यास सक्षम नसलेली पत्नी कमावत्या पतीकडून खावटी मागू शकते. त्याचप्रमाणे कमावता पती कमावत्या पत्नीकडून खावटी मागू शकतो. ही परोपकारी तरतूद आहे, असे न्यायालयाने सांगितले. २२ जुलै २०१६ रोजी अमरावती कुटुंब न्यायालयाने पत्नीला मासिक १० हजार रुपये खावटी मंजूर केल्यामुळे पुण्यात राहणाऱ्या तिच्या पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील फेटाळून लावताना या तरतुदीकडे लक्ष वेधले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या