विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जनतेच्या न्यायालयात जाणार,असा निर्धार महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे. त्यासाठी राज्यात विभागनिहाय जाहीर सभांचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. दिनांक व प्रमुख वक्ते याप्रमाणे…२ एप्रिल, संभाजीनगर, अंबादास दानवे. १६ एप्रिल, नागपूर, सुनील केदार. १ मे, मुंबई, आदित्य ठाकरे. १४ मे, पुणे, अजित पवार . २८ मे, कोल्हापूर, सतेज पाटील. ३ जून, नाशिक, छगन भुजबळ. ११ जून, अमरावती, यशोमती ठाकूर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>१५ दिवसांच्या बाळाला सोडून विवाहितेची सर्वोपचार रुग्णालयात आत्महत्या

महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय झाला असून काँग्रेसच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी या सभा यशस्वी करण्याची सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. जिल्हाध्यक्षांना या दृष्टीने तयारी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या सभांमधून बेरोजगारी, गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या व इतर विषयांवर जाब विचारण्याचे ठरले आहे.

More Stories onवर्धाWardha
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The mahavikas aghadi is now planning department wise public meetings in the people court pmd 64 amy
First published on: 17-03-2023 at 17:38 IST