बुलढाणा: शेतातील विहिरीमध्ये पाणी काढताना तोल गेल्याने मुलगी विहिरीत पडली. यामुळे क्षणाचाही विलंब न करता मुलीला वाचविण्यासाठी आईने थेट विहिरीत उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने तळाशी जाऊन अडकल्यामुळे या घटनेत आईचा मृत्यू झाला तर मुलगी सुदैवाने वाचली.

 खामगाव तालुक्यातील कोंटी येथे ही दुर्देवी घटना घडली.  बेबीबाई उमा खताळ (४०) असे मृत आईचे नाव आहेत. बेबीबाई  खताळ ह्या आपल्या मुलीला घेऊन सकाळी शेतात गेल्या होत्या. दरम्यान, कुमारी आकांक्षा (१४) ही विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेली असता अचानक तोल जाऊन विहिरीत पडली. मुलगी पाण्यात पडल्याचे लक्षात येताच आई बेबीबाईने  मुलीला पाण्यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
Worker dies due to suffocation in sewage tank
वसई : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू
vasai, drunkard husband marathi news, bomb blast dadar marathi news
बायकोला धडा शिकविण्यासाठी अजब शक्कल, दादर आणि कल्याण स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी
tortoise did not become a victim of the crocodile watch viral video
VIDEO: कासव पुन्हा जिंकले; कासवाची शिकार करण्यासाठी मगरीचा घेराव, पण…पुढे काय घडतं पाहाच

 परंतु, मुलगी पाण्यात खोलवर बुडत असल्याचे पाहून कुठलाही विचार न त्यांनी थेट विहिरीत उडी घेतली. मात्र, पाणी खोल असल्यामुळे त्या पाण्याच्या तळाशी गेल्या. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. मुलगी आकांशाने विहिरीतील पाली पकडून ठेवल्याने ती सुदैवाने वाचली.