वर्धा: वारली चित्रकलेच्या शालेय आविष्काराची राष्ट्रीय पातळीवर नोंद झाली असून या संग्रहाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नव्या शैक्षणीक धोरणाच्या तिसऱ्या वर्षाच्या निमित्याने केेंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे कॉफी टेबल बुक प्रकाशीत केल्या जात आहे. यात भारतातील सहा नवोपक्रमाचा समावेश असून वर्धेच्या ‘वारली पेंटींग’ या उपक्रमालाही त्यात स्थान मिळाले आहे.

वारली पेंटींग हा उपक्रम वर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजेच डाएटतर्फे राबविण्यात आला. आदिवासी जमातीने वारली कलेची देण समाजाला दिली आहे. सांस्कृतिक जीवनाच्या समृध्दीसाठी या आदिवासी कलेचे मोठे योगदान आहे. हा वारसा लक्षात घेवून डाएटने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बाला (बिल्डींग एज अ लर्निंग एड) उपक्रमात वारली पेंटींग उपक्रम सुरू केला होता. संस्थेच्या प्रशिक्षकांनी या कलेचे धडे दिले.

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा

हेही वाचा… धक्कादायक! वडिलांचा अबोला सहन न झाल्याने मुलाने संपविले जीवन

शिक्षकांच्या मागणीनुसार तीन कार्यशाळा झाल्या. तसेच इतर विद्यार्थी, कोषागार कर्मचारी, कारागृहातील बंदीजन यांच्यासाठी कार्यशाळा झाली. या उपक्रमाने अशी चित्रे काढण्याचे अनुभव विद्यार्थ्यांना मिळत आहे. इयत्ता दुसरी ते सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात वारली चित्रकलेचे धडे समाविष्ट आहे. शाळेच्या भिंतीवर, विहिरीवर, झाडाच्या बुंध्यावर, शाळेच्या फाटकावर वारली चित्रे काढण्यात आली आहे. ही चित्रे वारली एक्सप्रेस, दांडी यात्रा, सेवाग्राम आश्रम आदी वास्तूंचे रेखाटन करतात. तसेच या माध्यमातून वृक्षाराेपन, करोना जागृती, मुलींना शिकवा, स्वच्छ शाळा, निपुण भारत, शिक्षणाचा अधिकार व अन्य विषयाचे संदेश देण्यात आले आहे. या कलेचा विद्यार्थ्यांना गणितातील पूर्वगणना, इंग्रजीतील क्रिया, भूगोल, इतिहास या विषयाच्या अध्ययनात उपयोग होत आहे.

हेही वाचा… नागपूर : कोराडी वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलर ट्यूब लिकेजमुळे २१५ दशलक्ष वीज युनिट्सचे नुकसान!

कला ही अभ्यासक्रमासोबत जोडल्या गेल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी वाढल्याचे सांगितल्या जाते. उपक्रमात प्राचार्य, व्याख्याते, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांचा सहभाग लाभत आहे. महत्त्वाचे म्हणजे कलेचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होवू घातले आहे.