नागपूर : दहावीत असलेला १४ वर्षीय एकुलता मुलगा, वडिलाचे त्याच्यावर निस्सीम प्रेम, बापलेक असूनही दोघांची मैत्री, दोघेही नातेवाईकांमध्ये आणि वस्तीतही मित्रासारखे वावरत, मुलासाठी जीव ओवाळून टाकणारा बाप म्हणून ख्याती, दहावीत असलेल्या मुलाला वडिलांनी महागडा शिकवणी वर्ग लावला, मात्र, मुलगा शिकवणी वर्गाला जायला कंटाळा करीत होता, त्याला प्रेमाने धडा शिकवून शिकवणी वर्गाला पाठविण्याची वडिलांची योजना होती, वडिलांनी मुलाशी अबोला धरला, पण बापाचे प्रेम समजून घेण्यात लेक कमी पडला.

वडिलांचा अबोला त्याला सहन झाला नाही, वडिलांचे मन दुखावल्याचे मुलाला अतीव दु:ख, आता वडील आपल्याशी कधीच बोलणार नाहीत, अशी मनात सल, वडिलांचा दुरावा यामुळे मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपवले. वेद रितेश खेळवदकर (१४, रा. लालगंज, झाडे चौक) असे मृत मुलाचे नाव आहे.

elderly couple Divorce marathi news, Divorce of elderly couple marathi news
काय हे….? मुलीचे लग्न तोंडावर असताना वृद्ध दाम्पत्याचा घटस्फोट…
arrest Class XI student elopes with her father friend in Nagpur
अकरावीच्या विद्यार्थिनीचे वडिलांच्या मित्रासोबत पलायन; अपहरणकर्त्याला गोंदियातून अटक
Nagpur, girl Abuse, Lover absconded,
नागपूर : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती होताच प्रियकर फरार
Crime News
गोळ्या झाडून आईची हत्या, हातोड्याचे वार करुन पत्नीला संपवलं, मुलांना छतावरुन फेकल्यानंतर तरुणाची आत्महत्या
Anamika part 2
पत्नीची आई झाल्यानंतर नवऱ्याने जोडले विवाहबाह्य संबंध, पतीच्या दुसऱ्या लग्नाआधीच असे तोडले बाशिंग!
pune crime news, young man attempted suicide at police station
पत्नी नांदायला येत नसल्याने पोलीस चौकीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Nagpur, Man Stabs Brother to Death in Nagpur, Dispute about Parents, murder in nagpur, crime in nagpur, marathi news, crime news, nagpur crime news,
आईवडीलांना शिवीगाळ; मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून
Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना

हेही वाचा – नागपूर : भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक; भीषण अपघातात एक ठार, ८ जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेद हा दहावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील खासगी कंपनीत नोकरीवर आहेत. अभ्यासात हुशार असलेल्या वेदसाठी वडिलांनी नुकताच शिकवणी वर्ग लावला होता. मात्र, तो शिकवणी वर्गाला जात नव्हता. वडिलांनी त्याची समजूत घातली. तरीही तो जात नव्हता. वडिलांनी त्याला मारहाण करणे किंवा ओरडण्याऐवजी अबोला धरला. त्याच्याशी वडील तीन दिवसांपासून बोलत नव्हते. त्यामुळे वेदच्या हळव्या मनावर परिणाम झाला. त्याने आईशी बोलून शिकवणी वर्गात न जाण्यासाठी वडिलांची समजूत घालण्याची विनंती केली. मात्र, वडिलांनी त्याला अभ्यास आणि शिकवणी वर्गात गेल्यानंतरच बोलणार, अशी भूमिका घेतली.

हेही वाचा – नागपूर : कोराडी वीज निर्मिती प्रकल्पात बाॅयलर ट्यूब लिकेजमुळे २१५ दशलक्ष वीज युनिट्सचे नुकसान!

वडिलांची नाराजी आणि अबोला वेदला सहन झाला नाही. त्यामुळे वेदने रविवारी दुपारी दीड वाजता घरात ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. व्यथित झालेल्या वेदला दोन वाजता आईने चहा घेण्यासाठी आवाज दिला. मात्र, खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आई-वडिलांनी खिडकीतून डोकावून बघितले. वेद गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. आईने मोठ्याने हंबरडा फोडला तर वडील जमीनवर कोसळून बेशुद्ध पडले. अन्य नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी धाव घेतली. वेदला रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत वेदचा मृत्यू झाला. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. वेदच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.