लोकसत्ता टीम

नागपूर : नागपूर शहरामध्ये उन्हाच्या वेळेत कुठल्याही क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी स्पष्ट सुचना नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत नागपुरातील सर्व क्रीडा व सांस्कृतिक संघटना आणि शाळा, महाविद्यालयांना देण्यात आली आहे.

Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

नागपूर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या सूचना आणि दिलेल्या निर्देशानुसार क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी सुचना दिली आहे. क्रीडा व सांस्कृतिक संघटना आणि शाळा महाविद्यालयांना दिलेल्या आदेशामध्ये उन्हाच्या वेळेत खेळाच्या स्पर्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नये, सर्व सांस्कृतिक कार्यक्रम किंवा क्रीडा स्पर्धांच्या दरम्यान पिण्याचे शुद्ध पाणी, थंड जागा व गर्दीचे योग्य नियोजन असेल याबाबत खात्री करावी. उपस्थितांमध्ये उष्माघात विषयी जनजागृती करण्याचे देखील आवाहन केले आहे. नागपूर शहरातील तापमान वाढत असल्यामुळे उष्माघाताचा धोका जास्त संभावतो. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन महापालिकेद्वारे केले गेले.

आणखी वाचा-चंद्रपूर : अपक्ष आमदार किशोर जोरगेवार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, महायुती की महाविकास आघाडी…

नागरिकांनी घ्यायची काळजी…

नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघण्याचे टाळावे. उन्हात जायचे झाल्यास योग्य खबरदारी घेतली जावी. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरावीत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करावा, असेही महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-‘आरएसएस’चा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंब्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर…

हे करू नये…

उन्हाळ्यात उन्हात अतिकष्टाची कामे करू नये, दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेउ नये, दुपारी १२ ते ३ दरम्रान घराबाहेर जाणे टाळावे, उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाउ नये, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, गडद, घट्ट व जाड कपटे घालण्याचे टाळावे, बाहेर जास्त तापमान असल्यास शारीरिक श्रमाची कामे करू नये, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे, मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावित या सर्व बाबींची काळजी घेण्याचे देखील आवाहन महापालिकेतर्फे करण्यात