नागपूर : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये तीन खून झाले. त्यापैकी दोन खून हे शहरी भागात तर एक खून सावनेर पोलीस ठाण्याअंतर्गत झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे येथील कायदा व सुस्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संजय शंकरराव निघेकर (४५) रा. सुभाषनगर असे मृताचे नाव आहे. ते सातत्याने त्यांच्या पत्नीला मारहाण करत होते. त्यामुळे साहील हा त्यांचा मुलगा संतापला होता. बुधवारी मध्यरात्रीही संजय यांनी पत्नीला मारहाण केली. ही माहिती कळताच साहीलने चाकूने वडिलांचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली.

हेही वाचा – आता ‘एसबीएससी’ प्रवर्गासही घरकूल मिळणार

दुसरा खून बजाजनगर परिसरात झाला. येथे प्रेमचंद धनेश निशाद (२१) रा. ओम साईराम सोसायटी, विजयनगर या तरुणाचा खून भूपेंद्र बगमरिया (१९) याने केला. गुरुवारी जैतखांब परिसरातील गणेशोत्सव मंडळातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम होता. आरोपी या मंडळात सक्रिय होता. प्रेमचंदचे मित्र तेथे महाप्रसादासाठी गेले तेव्हा भूपेंद्रशी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे भूपेंद्र याने प्रेमचंद यांचा खून केला. या प्रकरणातही पोलिसांनी आरोपीला अटक केली.

हेही वाचा – ‘वृत्तपत्रांना जाहिराती द्या व कार्यक्रमाचे आयोजन करा’, कोण म्हणतंय असं व कारण काय? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या घटनेत २८ सप्टेंबरला सावनेर पोलीस ठाणे हद्दीत अमोल वामनराव गायकवाड (३७) यांचा खून झाला. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी अंकित कडू, प्रवीण उईके, प्रभाकर कोहळे यांनी दारू पिण्यासाठी अमोल यांना पैसे मागितले व दगडाने हल्ला चढवला. त्यात अमोलचा मृत्यू झाला.