गडचिरोली : जिल्ह्यातील उत्तर भागात वघांची संख्या वाढली असून दिवसेंदिवस हे वाघ गावाच्या वेशीवर येत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण दिसून येत आहे. अशात शुक्रवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील वैरागड गावाजवळ तलावाकाठी एकाचवेळी तीन वाघ दिसल्याने या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये तारांबळ उडाली. त्यातील काही प्रवाशांनी या वघांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. सध्या ही चित्रफीत समाज माध्यमावर सर्वत्र प्रसारित झाली आहे.

देसाईगंज आणि गडचिरोली वनविभागात मागील पाच वर्षांत वाघांची वाढलेली संख्या येथील सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे नागरिकांवर हल्लेदेखील वाढले आहेत. अशात गावानजीक प्रवाशांना किंवा शेतावर जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यालगत वाघ दिसणे नित्याचेच झाले आहे. काही दिवसांपूर्वी देसाईगंज तालुक्यातील फरी येथे एका महिलेचा वघिणीने बळी घेतला होता. त्या वाघिणीला वनविभागाने आठवडाभरातच जेरबंद केले. परंतु वाघांची संख्या वाढल्याने हे वाघ आता गावानजीक येऊ लागले आहेत.

हेही वाचा – बुलढाणा: रायपूर परिसराला मुसळधार पावसाने झोडपले, नदीला पूर,भाविकांची वाहने अडकली

हेही वाचा – भरती प्रक्रियेतून शासनाला सुमारे २६५ कोटींचा महसूल; सामान्य विद्यार्थ्यांच्या लुटीचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी रात्री आरमोरी तालुक्यातील वैरागड गावाजवळील तलावाकाठी एकाचवेळी तीन वाघ दिसून आल्याने या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सुदैवाने या वाघांनी हल्ला न केल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दरम्यान, काही नागरिकांनी आपल्याजवळील मोबाईल कॅमेऱ्यात या तीन वाघांना कैद केले असून ही चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात वनविभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.