नागपूर/गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रामघाट बिटात वाघाची शिकार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  गुरुवारी सकाळी दहा वाजता ही घटना उघडकीस आली. नव्या वर्षांतील हा तिसरा मृत्यू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवेगाव अभयारण्य परिसरातील प्रतापगड पहाडीला लागून असलेल्या निलज गावाजवळील रामघाट बिटातील कक्ष क्र.२५४ मध्ये ही घटना समोर आली.  अंदाजे तीन ते चार वर्षांच्या वाघाचा जबडा कापून वरचे दोन सुळे गायब होते. तर पंजा देखील कापण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. वीजप्रवाहाने ही शिकार करण्यात आल्याचे स्पष्ट होते. लगतच्या गावांमध्ये बुधवारी रात्रीपासूनच चर्चा सुरू होती, पण गुरुवारी सकाळी घटना उघडकीस आली. याच परिसरात टी-७ आणि टी-११ या दोन वाघांचा वावर आहे. मात्र, मृत   वाघ वेगळा आहे. सकाळी घटना उघडकीस येऊनही सायंकाळपर्यंत मृतदेह जागीच पडून होता. शवविच्छेदनदेखील शुक्रवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिकारीची घटना असल्याने तातडीने पुरावे शोधून कृती करणे आवश्यक असताना वनखात्याच्या या दिरंगाईवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger hunting crime police forest ysh
First published on: 14-01-2022 at 01:53 IST