गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज आणि गडचिरोली वनविभागात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, रस्त्यालगत त्यांचा मुक्तसंचारदेखील वाढला आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास देसाईगंज-आरमोरी मार्गावर वाघिणीचा चार बछड्यासह मुक्तसंचार एका प्रवाशाने कॅमेऱ्यात टिपला. यामुळे देसाईगंज-आरमोरी मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना सावध होणे गरजेचे आहे. वाघांच्या या मुक्तसंचारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

हेही वाचा – VIDEO : बापरे! अमरावतीत विद्यार्थ्यांनी भरलेली ट्रॅक्‍टर ट्रॉली उलटली; २२ जण जखमी

हेही वाचा – यवतमाळ: ऐन परीक्षेच्या काळात प्राध्यापकांचे आंदोलन; संस्थाध्यक्षांवर आर्थिक शोषणाचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

११ लोकांचा बळी घेणाऱ्या सीटी १ या आक्रमक वाघाला जेरबंद केल्यानंतर देसाईगंज परिसरात वाघाची दहशत काही प्रमाणात कमी झाली असली तरी अधूनमधून मुख्य मार्गालगत वाघांचा मुक्तसंचार पाहायला मिळतो. शुक्रवारीदेखील रात्रीच्या सुमारास चार पिलांसह वाघिणीला रस्ता ओलांडताना प्रवाशांनी कॅमेऱ्यात टिपले. सद्या ही चित्रफीत समाज माध्यमावर चांगलीच व्हायरल झाली आहे. परिसरात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.