नागपूर शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर खातमारी पांजरी (लोधी) येथे गेल्या चार दिवसांपासून वाघीण आणि तिचा बछडा फिरत आहे. या परिसरात तिने निलगायीची शिकार केली असून गावाच्या परिसरातच ते फिरत असल्याने गावकरी घाबरले आहेत. सायंकाळनंतर घराबाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद –

नागपूरपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील खातमारी पांजरी (लोधी) हे गाव आहे. या गाव परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून एक वाघीण तिच्या बछड्यासह फिरत आहे. या परिसरात निलगाईची शिकार झाल्यानंतर वनविभागाने येथे कॅमेरा ट्रप लावले असून, या कॅमेऱ्यांमध्ये देखील ते दिसले आहेत.

वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा –

तर, आम्हाला निर्देश देण्यापेक्षा वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. आम्ही घराबाहेर पडलो नाही तर शेतातील कामे कशी करणार?, आमचे नुकसान कोण भरुन देणार?, नुकतेच येऊ लागलेले पीक इतर प्राण्यांनी खाल्ले तर काय?, असे अनेक प्रश्न गावकऱ्यांना पडले आहेत.

More Stories onवाघTiger
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tigress is roaming near nagpur city footprints in the field msr
First published on: 09-07-2022 at 17:11 IST