अवकाळी पावसामुळे सातत्याने होणारे नुकसान व नापिकीला कंटाळून चिंचोली गणू येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शेतकरी शांताराम मोतीराम गव्हाळे (५४) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

चिंचोली गणू येथील शेतकरी शांताराम गव्हाळे यांच्याकडे शेत जमीन असून, सततची नापिकी आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान पाहून ते निराश झाले होते. त्यातून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. गट क्र. ५५ मधील त्यांच्या शेतात लिंबाच्या वृक्षाला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

हेही वाचा >>>धक्कादायक! करोनासह इन्फ्लूएन्झा, गोवरमुळे नागरिक बेजार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.