अमरावती : ‘रोडगा पार्टी’च्‍या निमित्‍ताने मालखेड येथील तलावानजीक सहभोजनासाठी गेलेल्‍या दोन तरूणांचा पाण्‍यात बुडून मृत्‍यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथील ही घटना आहे.

प्रणव सुरेश पायकाडे (१८) व निखिल अनंतराव खर्चान (२४, दोघेही रा. आष्टी) अशी मृतांची नावे आहेत. सावंगा विठोबा येथे श्री अवधुतबुवा संस्थान परिसरात गुढी पाडव्यानिमित्त मोठी यात्रा भरते. या ठिकाणी रोडग्याचे जेवण देण्याची परंपरा आहे. रोडगा हा विदर्भातील खास पारंपारिक खाद्यपदार्थ आहे. भातकुली तालुक्यातील आष्टी येथील पायकाडे कुटुंबाने बुधवारी रोडग्याचे जेवण ठरविले होते. त्यांच्यासमवेत निखिलदेखील आला होता. रोडग्याच्‍या जेवणाची तयारी सुरू असताना प्रणव व निखिल हे पोहण्यासाठी मालखेड तलावात उतरले. मात्र, त्यांचा गाळात फसून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच पायकाडे कुटुंबाने नागरिकांसमवेत मालखेड तलावाकडे धाव घेतली. चांदूर रेल्वे येथील पोलीस निरीक्षकांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह त्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण केले.

हेही वाचा…बुलढाणा : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने कोतवालास चिरडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथकाने दुपारी १ वाजेपासून शोधकार्य सुरू केले. काही वेळानंतर दोघांचेही मृतदेह शोधण्यात यश आले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. शोध व बचाव पथकाचे सचिन धरमकर, दीपक डोरस, दीपक पाल, गजानन वाडेकर, दिलीप भिलावेकर, गणेश जाधव यांनी शोधकार्य राबविले.