लोकसत्ता टीम

भंडारा : पोटापाण्यासाठी बाजारातील दुकानात पैसे मागत असलेल्या एका तृतीयपंथियाला इतर ५ ते ६ अनोळखी तृतीयपंथियानी बेदम मारहाण करून त्याचा अंगावरील साडी व ब्लाउज फाडून बाजारात नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील आठवडी बाजारात घडला. आश्विनी उर्फ अमोल हरिभाऊ रेवाडे, वय ३७ वर्षे, रा. सिंधी रेल्वे ता. सेलू, जिल्हा वर्धा, असे फिर्यादी तृतीयपंथीचे नाव असून या निंदनीय प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होताच समाज माध्यमांवर प्रतिक्रिया उमटत आहेत.

mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
boy tied to tree, boy beaten Temghar Pada,
ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

आणखी वाचा-नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजपकडून रस्ता रोको आंदोलन; कारण काय? वाचा…

अश्विनी अनेक वर्षापासून सिहोरा येथे वास्तव्यास असून परिसरातील आठवडी बाजारात पैसे मागून आपला उदरनिर्वाह करीत होती. शनिवारी सिहोरा येथील आठवडी बाजारात अनोळखी ५ ते ६ तृतीयपंथी रा. सर्व बालाघाट, मध्य प्रदेश यांनी अश्विनीला ‘तू आदमी होकर छक्का जैसा रहता है और हमारी बिरादरी को बदनाम करता है’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्या अंगावरील ब्लाउज व साडी काढून भर बाजारात तिची नग्न धिंड काढली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालावरून अनोळखी ५ ते ६ आरोपी तृतीयपंथियाविरुध्द सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तृतीयपंथी आरोपींचा शोध घेणे सुरू असल्याचे तुमसर उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव यांनी सांगितले.