यवतमाळ : ‘मर्डर सिटी’ अशी नवी ओळख मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सातत्याने सुरू आहे. यवतमाळ शहरात दोन घटना घडल्यानंतर पुसद शहर बुधवारी मध्यरात्री दुहेरी हत्याकांडाने हादरले. सोबत राहणाऱ्या मित्रांनीच दोन सख्ख्या भावांवर हल्ला करून त्यांना ठार केले. या हल्ल्यात तिसरा भाऊ गंभीर जखमी आहे.
राहुल हरिदास केवटे, विलास हरिदास केवटे अशी मृतांची नावे आहेत, तर बंटी हरिदास केवटे हा गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास पुसद शहरातील इटावा वॉर्ड भागात घडली. आरोपी पवन वाळके, निलेश थोरात, गणेश तोडकर, गणेश कापसे, गोपाल कापसे, अवि चव्हाण यांच्यासोबत केवटे बंधूंचा वाद झाला होता. यातूनच पवन वाळके याने मित्रांना सोबत घेऊन रात्री केवटे बंधू झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला केला. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा – नागपूर : रस्त्यावर कोट्यवधींचा खर्च तरी पुन्हा खड्डेच खड्डे
हेही वाचा – नागपूर: माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा तरुणीवर बलात्कार
गंभीर जखमीला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. पुसद पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सततच्या खुणांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे.