नागपूर : अरुण थूल मृत्यूप्रकरणी दोन वर्षांच्या तपासानंतर पंचशील चौक, सीताबर्डी येथील गंगाकेअर रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. अश्विनी कुमार खांडेकर आणि डॉ. वरुण भार्गव अशी आरोपी डॉक्टरांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुग्णाच्या मृत्यूनंतर बनावट वैद्यकीय कागदपत्रे तयार करणे आणि उपचारादरम्यान वापरलेल्या औषधांची बिले तयार केल्याचा आरोप अरुण थूल यांचा मुलगा मोनाल थूल यांनी केला होता. माहिती अधिकारात सीजीएचएस (केंद्रीय आरोग्य योजना सेवा) मागितलेल्या बिलमध्ये व पोलिसांच्या मार्फत मिळालेल्या बिलमध्ये तफावत आढळून आली होती. अरुण थुल यांच्या मृत्यूनंतर २९ ऑक्टोबर २०२० रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आणि शवविच्छेदन करण्यात आले.

मोनाल यांच्या मागणीवरून या प्रकरणाचा तपास सीताबर्डी पोलिसांकडून काढून अंबाझरी पोलिसांना देण्यात आला होता. पोलिसांच्या तपासात २१ जून २०२२ रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्यातील गंगाकेअर हॉस्पिटलचे डॉ. अश्विनी कुमार खांडेकर आणि डॉ. वरुण भार्गववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two doctors nagpur charged accused forging medical documents death patient amy
First published on: 23-06-2022 at 11:35 IST