नागपूर : नागपूर विभागाच्या विशेष तपासणी मोहिमेत २००० हून अधिक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून १४ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तिकीट तपासणी मोहीम उघडली होती. ही मोहीम २७ एप्रिल २०२४ रोजी सुरू करण्यात आली. यात अवैध तिकीट किंवा अनियमित तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करण्यात आले. विनातिकीट प्रवास करणे किंवा अनियमित प्रवास करणाऱ्यांना एकूण २२१७ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून १४ लाख २७ हजार १७५ रुपये दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम नागपूर विभाग अशीच सुरू ठेवणार आहे. रेल्वे अधिकारी प्रवासी जनतेला तिकीट नियमांचे पालन करण्याचे आणि अनियमित प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 2000 passengers were found traveling without tickets in a special inspection drive of nagpur division rbt 74 amy
First published on: 30-04-2024 at 00:37 IST