काही कुलगुरू निवृत्त झाल्यावर आरोप करतात की उदय सामंत विद्यापीठामध्ये हस्तक्षेप करतात. मात्र, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हवा असेल, यांच्या स्वतःच्या वेतनाची किंवा कुलसचिवांची थकबाकी असेल तर मंत्र्याची मदत हवी. मात्र चांगल्या गोष्टीसाठी आम्ही सूचना दिल्या तर लगेच हस्तक्षेपाचा आरोप होतो, असं म्हणत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उघडपणे कुलगुरुंसमोरच आपली नाराजी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठच्या (बाटू) नागपूर येशील उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

नक्की वाचा >> इंग्रजांनी दिलेल्या पध्दतीऐवजी यापुढे दीक्षांत सोहळे मराठमोळ्या पद्धतीने होणार; उदय सामंतांनी केली घोषणा

आजपर्यंत कधीतरी शिवसेनेच्या एखाद्या मुलाला प्रवेश द्या किंवा नोकरी द्या म्हणून संपर्क केला असेल तर सांगा, आताच पदाचा राजीनामा देतो. मात्र छत्रपतींच्या राज्यात दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आपण कायम चांगल्या गोष्टीसाठी हस्तक्षेप करणार असल्याचे सांगत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी कुलगुरूंना चांगलीच समज दिली.

पुणे विद्यपीठात अनेक वर्षांपासून पडून असलेली छायाचित्रे लावायच्या सूचना केल्या किंवा रानडे इन्स्टिट्यूटची जागा वाचवण्यासाठी प्रयत्न केला असेल तर हा शिक्षण मंत्रीचा हस्तक्षेप ठरतो का? असा सवाल सामंत यांनी यावेळी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठाच्या अनेक प्राधिकरणामध्ये होणाऱ्या कुठल्या निर्णयात दखल दिली नाही, मला त्या समित्यांवर असणाऱ्यांची नावेही माहिती नाही, असे असतानाही हस्तक्षेपचा आरोप असेल तर तो साफ खोटा आहे. विद्यापीठात राजकारण राहाता कामा नये, येथे केवळ विद्यार्थी हाच प्रमुख असेल असेही हे म्हणाले.