scorecardresearch

“आंबेडकर-ठाकरे युतीचा ‘मविआ’शी काहीही संबंध नाही”, नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्यपालांतर्फे शिंदे-फडणवीस यांना..”

२ फेब्रुवारीला कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीवर महाविकास आघाडीच्या बैठकीत कोण कुठली जागा लढविणार हे ठरणार असल्याचेही पटोले म्हणाले.

Ambedkar Thackeray alliance nana patole
"आंबेडकर – ठाकरे युतीचा 'मविआ'शी काहीही संबंध नाही", नाना पटोलेंची प्रतिक्रिया (image – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

गोंदिया : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्याशी युती झाली असेल तरी याचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही, असा महाविकास आघाडीला प्रस्तावही नसल्याचे पटोले म्हणाले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत प्रवेश ही केवळ कहानी असल्याचे पटोले म्हणाले. ते गोंदियात एका लग्न सोहळ्यात आल्यावर माध्यमांशी बोलत होते.

या युतीमुळे काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजप आपले पाप लपविण्याकरिता हे सगळे करत आहे. पण या व्यतिरिक्त राज्यात इतर महत्वाचे प्रश्न नाहीत का? महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव मिळत नाही. पण या सर्व गंभीर विषयावरून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्याकरिता भाजपवाले महाविकास आघाडीत वंचितचा प्रवेश, असे मुद्दे समोर करीत असल्याचे पटोले म्हणाले.

हेही वाचा – गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील नामकरण प्रकरण आणखी तापणार, आदिवासी कार्यकर्ते वसंंतराव कुलसंगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

हेही वाचा – प्रजासत्ताक दिनी तीन शाळकरी मुले पोहायला गेले अन…

२ फेब्रुवारीला कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीवर महाविकास आघाडीच्या बैठकीत कोण कुठली जागा लढविणार हे ठरणार असल्याचेही पटोले म्हणाले. एक सर्वेक्षण आले आहे त्यानुसार लोकसभेच्या ३८ जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा दावाही नाना पटोले यांनी केला. राज्यपालांतर्फे शिंदे – फडणवीस यांना सरकार स्थापण्यासाठी निमंत्रण नव्हते, हे आता माहिती अधिकारातून उघड झाले असून, हे सरकार असंवैधानिक असल्याचे नाना पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 13:04 IST