बुलढाणा : जनसंघाच्या लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत काम केले. पुढे भाजपाच्याही जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्याग, बलिदान, समर्पण या तत्वाने काम केले. परंतु, आज चित्र बदलले आहे. आता भाजपा मोठा झालाय, दाही दिशांना विस्तारलाय. भाजपाचे ‘दुकान’ जोरात सुरू आहे. मात्र या दुकानात नवीन ग्राहकच जास्त दिसत आहेत. जुने काही दिसत नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षाच्या सद्यस्थितीवर मार्मिक टाेला लगावला.

स्थानिय गर्दे वाचनालयात आज शुक्रवारी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोकुल शर्मा यांच्या अमृत महोत्सवी सत्कार कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विविध पक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी भाजपाच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा धावता आढावा घेत जुन्या निष्ठावान व समर्पित पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आदरपूर्वक उल्लेख केला. ते म्हणाले, मला महामंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा इतर ज्येष्ठांचा विचार करण्याची विनंती मी केली. मात्र त्यांनी ‘नितीन आम्ही पक्षाचे वर्तमान आहोत, तू भविष्य आहेस’ असे सांगून मलाच महामंत्रीपद स्वीकारण्याची गळ घातली. तेव्हाचे राजकारण असे होते. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण असा त्याचा अर्थ होता. मात्र आज राजकारणाचा बाज बदलला आहे, व्याख्या बदलली आहे. आजचे राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण असे स्वरूप झाले आहे. लाखो जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्याग, बलिदान, समर्पण या तत्वाने काम केले. स्वतःला निस्वार्थपणे पायव्यात गाडून घेतले, म्हणून आज पक्षाची उत्तुंग इमारत उभी राहिली आहे. यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता आज शिखरावर पोहोचला आहे. आता पक्ष मोठा झाला, दाही दिशांना विस्तारलाय, पण जुने कार्यकर्ते फारसे दिसत नाही, नवीनच जास्त दिसतात, असेही गडकरी म्हणाले.

हेही वाचा – नागपुर : सीएनजीच्या दरात मोठी घसरण… आजचे ‘हे’ आहेत दर

हेही वाचा – कोराडीतील ६६० मे.वॅटचा संच बंद, राज्यातील वीज पुरवठ्यावर काय परिणाम होणार? वाचा..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सोहळ्याला खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे, संजय रायमूलकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, माजी आमदार चैनसुख संचेती काँग्रेस नेते गणेश पाटील, हर्षवर्धन सपकाळ हजर होते. संचलन संजय कुळकर्णी यांनी केले. आशुतोष वाईकर यांनी वाचनालयाचा आढावा मांडला.