लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा: आज पहाटे झालेल्या मुसळधार वृष्टीने चित्रच पालटले.विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा शेतपिकांचे मोठे नुकसान करणारा ठरला. आंबा मोहोर गळून पडला. कापणीला आलेल्या गहुपिकाचे प्रामुख्याने नुकसान झाल्याचे कृषी अधिक्षक डॉ विद्या मानकर म्हणाल्या. मात्र पाउस व सध्याही असलेल्या आभाळी वातावरणात गावोगावी पेटलेली होळी विझू विझू झाली. पहाटेस होळीतील निखारे विझल्याने प्रथा भंगली.याच निखाऱ्यावर पाण्याचे हंडे ठेवले जातात. रंगाने माखून घरी आल्यावर गृहिणी या हंड्यातील गरम पाण्याने पती,मुलांना न्हाऊ घालतात. पण अवकाळी पावसाने निखारे विझले व पाणी गरम झालेच नाही. असा तक्रारवजा सूर महिलांचा उमटला. वर्धेसह असंख्य गावात चारवेळा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी झाडे कोसळली. सध्या आढावा घेणे सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal heavy rain gram wheat fell mangoes blossom collabs holi was extinguished pmd 64 mrj
First published on: 07-03-2023 at 13:08 IST