लोकसत्ता टीम

अकोला: गोवा राज्यातील फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थान येथे १६ ते २२ जूनदरम्यान अखिल भारतीय वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ११ वर्षांपासून दरवर्षी हा महोत्सव घेण्यात येतो. या महोत्सवात विदर्भातून शेकडो पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर यांनी दिली.

BJP spent 38 crores in online advertisements in three months
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च; ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
survey of disabled in maharashtra,
राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?

महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला हिंदू विधिज्ञ परिषदेचे ॲड. मुकुंद जालनेकर, राष्ट्र जागृती मंचचे संस्थापक अध्यक्ष संजय ठाकूर, समितीच्या जिल्हा सहसमन्वयक ॲड. श्रुती भट आदी उपस्थित होते. अधिवेशनामध्ये नेपाळसह भारताच्या २८ राज्यांतून दीड हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यंदाच्या अधिवेशनामध्ये ‘हिंदू राष्ट्र संसद’ या वैशिष्ट्यपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींचे परिसंवाद, तसेच विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती अधिवेशनाचे विशेष आकर्षण असणार आहे. विविध विषयांवर महोत्सवामध्ये विचारमंथन होणार असल्याचे श्रीकांत पिसोळकर म्हणाले.

हेही वाचा… काँग्रेसच्या ६० वर्षांपेक्षा ९ वर्षात जास्त विकास; केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांचा दावा

अधिवेशनाला देशातील विविध धर्मपीठांच्या संतांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय ज्येष्ठ अधिवक्ता हरिशंकर जैन, ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टीस’चे राष्ट्रीय प्रवक्ते विष्णू शंकर जैन, तेलंगणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, ‘हिंदू इकोसिस्टिम’चे संस्थापक कपिल मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे संकेतस्थळावरून थेट प्रक्षेपण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.