लोकसत्ता टीम

नागपूर: महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झालेल्या दर्शन कॉलनी मैदानात भाजपने गोमूत्र शिंडपल्यानंतर त्याला प्रतिउत्तर म्हणून काँग्रेसने मंगळवारी भाजपला सुबुद्धी यावी, यासाठी त्याच ठिकाणी यज्ञ केला.

भाजपने आघाडीच्या सभेला पहिल्यापासून विरोध केला. या खेळाचे मैदान सभेला दिले जाऊ नये म्हणून आंदोलन केले. तसेच त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने सभेला परवानगी दिली आणि भाजपचे मनसुबे उधळले गेले. परंतु भाजपने आंदोलन कायम ठेवले. सभा रविवारी झाली आणि सोमवारी भाजपने गोमूत्र शिंपडले. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला. सभेला पूर्वविदर्भासह स्थानिक प्रभागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपने येथे गोमूत्र शिंपडून त्यांचा अपमान केला. हे त्यांचे कृत्य विकृत मानसिकतेचे लक्षण आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी नगरसेवक तानाजी वनवे यांनी केली. आज वनवे यांच्या मुलाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपला सुबुद्धी मिळावी म्हणून दर्शन कॉलनी मैदानात यज्ञ केला.