अकोला : एरवी टीका करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वंचितला इंडिया आघाडीत समाविष्ट करण्यासाठी शरद पवारांनी काँग्रेस पक्षाकडे शब्द टाकून पाठपुरावा केला. त्यामुळे वंचितने त्यांचे आभार मानले. काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याची टीकादेखील वंचित आघाडीने केली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अमरावती येथे बोलताना, मल्लिकार्जुन खर्गे यांना वंचितच्या पत्राला उत्तर देण्याची आणि प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीसह इंडियाचे निमंत्रण देण्याची विनंती दिल्लीमध्ये केल्याचे सांगितले. वंचित आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेचे जाहीर स्वागत करून आभार मानले. १९ डिसेंबर रोजी झालेल्या चौथ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करतो, असे ते म्हणाले.

हेही वाचा – लग्नाचे आमिष दाखवून इंस्टाफ्रेंडचा तरुणीवर बलात्कार

हेही वाचा – नागपुरात कचऱ्याच्या टिप्परने बहीण, भावाला चिरडले; संतप्त जमावाने टिप्पर पेटवला, दगडफेक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अद्याप भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालय किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यालयाकडून कोणतेही पत्र किंवा कोणत्याही प्रकारचा संवाद झालेला नाही. आम्ही आघाडी करण्यासाठी सकारात्मक आहोत. इंडिया व मविआ आघाडीत आमंत्रित करण्यासाठी काँग्रेसकडून प्रतिसादाची वाट पाहत आहोत, असे सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.