लोकसत्ता टीम

नागपूर: नागपूरचे खासदार व केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री यांचे रस्ते बांधणी क्षेत्रातील देशपातळीवरील काम सर्वविदित आहे. याबाबत त्यांचे अनेकदा कौतुकही झाले. नागपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही ते गडकरींचे प्रशंसक असल्याचे जाहीरपणे सांगितले.

आणखी वाचा-मविआतील घटक पक्षांनी प्रथम त्यांचे पक्ष एकसंघ ठेवावे – फडणवीस

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारंभ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरात रविवारी पार पडला. या कार्यक्रमाला नितीन गडकरीही उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना चौकटीबाहेर विचार करून स्टार्टस अप, युनिकॉन उभारावेत, असे आवाहन केले. ते म्हणाले “मी तुम्हांला सांगतो मित्रांनो, मी गडकरींचा प्रशंसक आहे. कारण ते कुठल्याही संकटाला तोंड देताना नावीन्यपूर्ण आणि चौकटी बाहेरच्या दृष्टिकोनातून उपाय शोधतात. त्याचे प्रतिबिंब तुम्हाला रस्ते बांधणीत सापडेल. त्यांनी टाकावू साहित्याचा वापर रस्ते बांधणीसाठी वापर करणारी यंत्रणा विकसित केली.