चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटरवर सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरंगुळा म्हणून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच सार्वत्रिक झाला आहे. या व्हिडीओत एका प्लास्टिक टेबलवर उभे राहण्यासाठी बकऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. मात्र एकही बकरी टेबलवर उभी राहू शकत नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीत असेच चित्र असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

राज्यातील राजकीय परिस्थिती मागील चार वर्षांपासून अस्थिर आहे. महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला असल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या चार वर्षांचा विचार केला तर भाजपा – अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळा, त्यानंतर शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेसचे महविकास आघाडी सरकार, त्यानंतर शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे शिवसेना व भाजपा सरकार, आता एक वर्षाचा कालावधी या सरकारला पूर्ण होत नाही तोच या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची व इतर ८ जणांनी घेतलेली मंत्रीपदाची शपथ यामुळे राज्यातील राजकारण कशा प्रकारे सुरू आहे हे जनतेने अनुभवले.

हेही वाचा – चंद्रपूर: तलाठी पदाची जाहिरात जुन्याच अधिसूचनेनुसार प्रकाशित, बदल न झाल्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आंदोलनाचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर समाजमाध्यमांवर असंख्य प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमावर टाकलेला व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे.