वर्धा : १७व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीची सुरुवात बळीराजाच्या नांगरणीद्वारे करण्यात आली. ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा समारंभ पुरोहिताच्या मंत्रोच्चारात झाल्याने टीका उमटल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही भूसन्मान करीत प्रारंभ केल्याचे स्वागताध्यक्ष नितेश कराळे म्हणाले.

सर्कस ग्राउंड येथे ४ व ५ फेब्रुवारीला अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. शुक्रवारी मंडप उभारणीचा प्रारंभ रोठा येथील शेतकरी तुकाराम राऊत व मारोती तेलकट यांच्या हस्ते नांगरणी करता झाला. यावेळी स्वागताध्यक्ष कराळे, मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे, महाराष्ट्र अंनिसचे गजेंद्र सुरकार, प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई, सत्यशोधक जनार्दन देवतळे, डॉ. विश्वनाथ बेताल व निमंत्रक राजेंद्र कळसाईत यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा >>> अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : वर्धेतील मराठी साहित्य संमेलनाचा अपेक्षित खर्च अडीच ते तीन कोटी, ‘मात्र हाताशी अवघे…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राच्या भूमीत प्रतिगामी विचारांचे पसरत असलेले तण रोखण्यासाठी हा बळीराजाचा सन्मान करणारा प्रतीमात्मक कार्यक्रम झाल्याचे डॉ. चोपडे म्हणाले. यावेळी बळीराजा, जिजाऊ व सावित्री तसेच भीमराया यांचा जयघोष करण्यात आला. संदीप चिचाटे यांनी गीत सादर केले. तर संजय भगत यांच्या प्रबोधन गीताने समारोप झाला.