चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपोषणाकडे पाठ फिरवितात हे ओबीसी समाजाचे दुर्देव आहे. मुख्यमंत्र्यांना काश्मीरला पर्यटनाला जाण्यासाठी वेळ आहे, मात्र ओबीसी समाजाच्या टोंगेंचे उपोषण सोडविण्यासाठी येत नाही, अशी खरमरित टिका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी येवून टोंगेंचे उपोषण सोडवावे, अशी मागणी भाजपा नेते आशिष देखमुख व आमदार परिणय फुके यांनी केली.

टोंगे यांच्या उपोषण मंडपाला रविवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह भाजपा नेते आशिष देखमुख, परिणय फुके यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट देऊन उपोषण सोडविण्याची मागणी केली. मागण्या पूर्ण होत नाही तोवर उपोषण सोडण्याचा प्रश्नच येत नाही असे टोंगे म्हणाले. दरम्यान वडेट्टीवार यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीका केली. १९ सप्टेंबर रोजी संसदेशे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. तिथे तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या धर्तीवर जातनिहाय गणना केली जाईल, असे जाहीर करावे, असेही वडेट्टीवार म्हणाले. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना जातनिहाय गणना करण्याचा ठराव केला होता असेही ते म्हणाले. आता राज्य सरकारला केवळ अंमलबजावणी करायची आहे, मात्र तीसुद्धा केली जात नाही. ओबीसी वसतिगृहाच्या संदर्भातही निर्णय घेतला गेला नाही. ओबीसींना घरकुल मिळत नाही, ५२ टक्के ओबीसींना राज्याच्या तिजोरीतून एक हजार कोटी रुपये काढून घरे देण्याची मागणी केली होती. मात्र तीसुद्धा सरकारने पूर्ण केली नाही. मराठ्यांना आमचा वाटा देऊ नका, त्यांचा वाटा त्यांना देण्यात यावा, आरक्षणाची टक्केवारी वाढवावी असेही ते म्हणाले.

Gopal Shetty Take back From Election
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी, बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
sharad pawar ajit pawar (4)
“जी व्यक्ती जाऊन ९ वर्षं झाली…”, शरद पवारांची आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानावर नाराजी!
Sunil Tatkare On Jayant Patil
Sunil Tatkare : ‘अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तर…’, सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
Brijbhushan Pazare warned about to commit suicide if he pressured to withdraw candidature
“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा

हेही वाचा – ‘अब तक ५९…’ ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे यांनी ५९ व्या वाघिणीला केले जेरबंद

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ओबीसींना ५० टक्के शिष्यवृत्ती सुरू केली. मात्र आता शंभर टक्के शिष्यवृत्ती ओबीसींना मिळत नाही. ८० टक्के मराठा समाजाच्या हातात साखर कारखाने, शिक्षणसंस्था व उद्योग आहे. तरी मराठा समाजाची स्थिती वाईट आहे, २० टक्के ओबीसी व इतर समाजाच्या हातात आहे, तेव्हा ओबीसी समाजाची स्थिती किती वाईट असेल याचा विचार सरकारने करावा, असेही वडेट्टीवार म्हणाले. ओबीसी अजूनही झाडाच्या पालाखाली घर करून वास्तव्य करित आहेत. मराठा समाजाचे आंदोलन मुख्यमंत्र्यांनी सोडविले, आम्ही त्याचे स्वागत करताे, सात दिवस झाले ओबीसी समाजाचा तरुण उपोषण करत आहे, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी टोंगे यांचे उपोषण सोडवावे, जिल्ह्यात मंत्री आहेत, ते ओबीसी नाहीत, म्हणून त्यांनी उपोषण सोडविण्यासाठी येऊ नये असे नाही, तेव्हा टोंगे यांचे उपोषण सोडवावे असेही वडेट्टीवार म्हणाले.

आजही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, चर्चेतून मार्ग काढून उपोषण सोडवावे, ओबीसी आरक्षणात मराठ्यांना वाटा देणार नाही या उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत करतो, असेही वडेट्टीवार म्हणाले. उपोषण सोडविले नाही तर ओबीसींच्या रोषाला बळी पडावे लागेल, असाही इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

हेही वाचा – गडचिरोली : महिलेचा बळी घेणारी टी १४ वाघीण जेरबंद, फरी जंगलात होती दहशत

मुख्यमंत्री काश्मीरला फिरायला जात आहेत, नुकतेच त्यांनी मराठवाड्याचे पर्यटन केले, विदेशातही ते जाणार आहेत. त्यांनी तिथे फिरायला जायचे तिथे जावे, मात्र टोंगे यांचे उपोषण सोडवून जावे असेही ते म्हणाले, ओबीसींचे आरक्षण पहिलेच कमी झाले आहे, तेव्हा तत्काळ याबाबत निर्णय घ्यावा, असेही वडेट्टीवार म्हणाले. भाजपा नेते आशिष देशमुख आमदार परिणय फुके यांनीही उपोषण मंडपाला भेट दिली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ चंद्रपूर येथे येऊन टोंगे यांचे उपोषण सोडवावे, अशी विनंती केली.