वर्धा : सफाई अभियानाचा संदर्भ देत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. रविवारी रात्री ते येथे सुरू युवकांच्या आंदोलनास भेट देण्यासाठी आले होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मनुष्य शुद्ध करणारी मशीन व पावडर शोधलाय. सफाई अभियानाच्या निमित्ताने विरोधकांची सफाई करण्यात आली. शिंदे काही खोटे बोलले नाही. ईडी रडारवर असलेले लोकं सत्तेत गेले म्हणजे सफाई झाली. सर्व स्वच्छ झाले.

हेही वाचा – पोलीस विभागातील लाचखोरीत घट; महसूल विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार

हेही वाचा – छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण – सुधीर मुनगंटीवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाच्या ओबीसी जनजागरण यात्रेवरही त्यांनी मत व्यक्त केले. भाजपाला आमचा प्रश्न आहे की त्यांनी ओबीसीसाठी काय केले ते सांगावे. जातीनिहाय जनगणना केली का, त्याचे उत्तर द्यावे. महिला आरक्षण बिल आणले, त्यात महिलांसाठी किती जागा राखीव केल्या, त्याचे उत्तर द्यावे. राज्य सरकारने कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय घेतला आहे. तो रद्द होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. हा निर्णय सरकारला परत घ्यावाच लागेल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.